डॉ.प्रशांत बबनराव नाईकवाडी
B.Sc. Agriculture
M.Sc. Plant Technology
M.B.A.(Agri Business Management
& International Trade).
P.hD(National Programme for Organic
Production of India & Its Regulation)

Welcome



Over the most recent few years, since I have joined the online medium, I have understood that getting the opportunity to communicate with every one of you is extraordinary compared to other returns I escape my generally exceptionally requesting activity. So here I am, endeavoring to make a space where you and I can incorporate every one of those delightful minutes that mean a considerable measure to me, as well as influence me to reflect and gain from my flaws. While all the person to person communication locales are exceptionally fascinating stages to connect, because of a lack of time, I can't keep myself refreshed with every one of the pages continually. My site will coordinate everything on different pages and I plan to stay in contact with you all the more consistently now!

About Me





कार्य करीत असलेल्या संस्थाची पदे

वरिष्ठ सेंद्रिय शेती प्रमाणिकरण अधिकारी
नोका, (अपेडा मान्यताप्राप्त संस्था), पुणे.

चेअरमन
रेसिड्यू फ्री ऑर्गणीक मिशन इंडिया फेडरेशन,पुणे

आंतराष्ट्रीय प्रमाणिकरण अधिकारी
बायोअॅग्रीसर्ट युरोपियन प्रमाणिकरण संस्था, बोलोग्ना, इटली.

तांत्रिक अधिकारी
महाराष्ट्र सेंद्रिय शेती परिषद (मॉफ), पुणे.

संचालक
कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र, पुणे.

महाराष्ट्र राज्य सल्लागार समिती सदस्य
पंतप्रधान पारंपारिक कृषी विकास योजना
सेंद्रिय शेती(पी.जी.एस.इंडिया),कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

लेखक,सकाळ प्रकाशन , पुणे

पुस्तके: 1) तांत्रिक दृष्टीकोनातून सेंद्रिय शेती
(महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार २०१६)
(यशवंतरावचव्हाण वांग्मय पुरस्कार)
(वसंतराव नाईक राज्य वांग्मय पुरस्कार) २०१६ प्राप्त पुस्तक

२) सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानके तांत्रिक

संचालक, व्यंकटेश अग्रोटेड प्रा. ली. नासिक.



कार्यपरिचय

१) नोका:(National Organic Certification Association,Pune )या प्रमाणिकरण संस्थेअंतर्गत २००८ ते आजतागायत महाराष्ट्र ,मध्यप्रदेश,गुजरात,बिहार,उत्तरप्रदेश,सिक्कीम,उत्तराखंड, छत्तिसगढ,पंजाब,हिमाचल प्रदेश,आसाम,नागालँड, ओरिसा,अरुणाचलप्रदेश,कर्नाटक,तामिळनाडू इ. राज्यात जवळपास ५०,००० हेक्टर क्षेत्राचे व २५,००० हून अधिक शेतकऱ्यांचे गट सेंद्रिय शेती प्रमाणिकरण पद्धती व वयक्तिक सेंद्रिय शेती प्रमाणिकरण पद्धतीद्वारे प्रमाणिकरण निरीक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले.

२) जैविक निविष्ठा :देशभरातील नामांकित जैविक निविष्ठा (जैविक बियाणे ,खते , व जैविक कीटकनाशके) व कृषीमालावर प्रक्रिया करणाऱ्या जवळपास २५० हून अधिक कंपन्याचे प्रमाणिकरण निरीक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

३) IFOAM प्रतिनिधित्व:सन २०११ मध्ये जर्मनी देशातील नुरेबर्ग शहरात जर्मन कॉंग्रेस व आयफोम (IFOAM:International Federation Of Organic Agriculture Movement) आयोजित बायोफाच विव्हानेस 1४-१९ फेब्रुवारी २०११ या जागतिक सेंद्रिय परिषदेला (organic World Trade Fair)नोका या प्रमाणिकरण संस्थेकडून भारत देशाचे प्रतिनिधित्त्व. या परिषदेत १२८ देशातील कृषी विभागातील शासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ ,सेंद्रिय पदाथार्चे व्यापारी,विद्याथी ,शेतकरी,नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक,सेंद्रिय प्रमाणिकरण संस्थेचे अधिकारी यांचा समावेश होता. या निमित्ताने सदर परिषदेत आयोजित केलेल्या खालील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये भारतीय म्हणून प्रतिनिधित्व व सक्रीय सहभाग.

i) Nanotech In Organic Agriculture (सेंद्रिय शेतातील nanotechnology )
Speaker:
Mr.John Faster:
Director of Soil Association and Formal board Member of united state dept. of Agriculture organic Production Programme.
(संचालक, साईल असोसिअशन)
Dr.John Paul:
Scientist of (n-technology)cambridge University

ii) Imroving the Certification System (सुधारित सेंद्रिय प्रमाणिकरण पद्धती)
Speaker:
Proff. Raffele Zanoli:
University Of Polytechnics ,dellemache

iii) Pesticide residue and organic quality(रासायनिक अवशेष आणि सेंद्रिय मालाची प्रत)
Speaker:
i.Miss. Kristern Ark:BNN Herhertellung
ii.Miss. silke Bruns:Lach & Brun Partner Schaft.

iv) US Organic Integrity Approach(अमेरिका सेंद्रिय एकाग्रता धोरण)
Speaker:
i. Dr.Ruihong Guo
Director International Accrediation & Activity NOP.
ii. Jake Lewin (जेक लेविन):
Chief certification officer, LLC. (मुख्य प्रमाणिकरण अधिकारी, एल.एल.सी)

v) GMO- What has taken to make it history(जि.एम.ओ: इतिहासाने काय साध्य केले)
Speaker:
i. Dr. Marcel Huber (डॉ.मर्केल हुबर):
Scientist, wageningen University & Reaserch Science Center, Netherland.

vi) IFOAM Organic Guarantee System.
Speaker:
i.Dr. Sussane Padel (डॉ.सुझान पॅडल):
The Organic Research Centre, U.K (सेंद्रिय संशोधन केंद्र, इंग्लंड)
ii. Mrs.Florentine Meinshausen (मिस.फ्लोरेन्टाईन मेइन्शौसेन)
IMO, Europe, (आय.एम.ओ, प्रमाणिकरण संस्था, युरोप)

४. बायोअॅग्रीसर्ट युरोपियन प्रमाणिकरण संस्था, बोलोग्ना, इटली येथे आंतराष्ट्रीय प्रमाणिकरण (निरीक्षक) अधिकारी (International Organic Inspector)हे विविध देशातील “आंतराष्ट्रीय सेंद्रिय मानके व प्रमाणिकरण पद्धती या विषयाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. खालील विविध आंतराष्ट्रीय सेंद्रिय माणकांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.
A. NOP/USDA (National Organic Programme (अमेरिका देशाचे सेंद्रिय शेतीचे मानके)
B. IFOAM(International Federation of organic Agriculture Movement) (आंतराष्ट्रीय सेंद्रिय शेती चळवळ परिषद मानके)
C. JAS (Japanese Agriculture standard) (जापनीज अॅग्रीकल्चर मानके)
D. Bioagricert Bio & Natural Cosmetic standard (बायोअॅग्रीसर्ट अँड नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने मानके)
E. Bioagricert OPERAEQUA/ Fair Trade Standard (बायोअॅग्रीसर्ट उत्तम व्यापार मानके)
F. GOTS (Global Organic Textile Standard) (जागतिक सेंद्रिय कापड मानके )
G. Bioagricert software and certification procedures (बायोअॅग्रीसर्ट संघनक प्रणाली आणि प्रमाणिकरण पद्धत)
H. EFAPA and FIPA Korean Organic Programs. (कोरिया देशाचे सेंद्रिय शेतीचे मानके)

५. सुरक्षित अन्न व प्रक्रियायुक्त अन्न (Food Safety Standard)याबाबतचे ISO-22000 (HACCP) मानकाचे स्टँन्डर्ड ऑस्ट्रोलीयन इंफोटेक ग्लोबल, ऑस्ट्रोलीया यांच्या कडून ५ दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.
A. RABQSA- Management System Auditing
B. RABQSA- FA- Food Safety Management
C. RABQSA- TL- Leading Management System Audit Teams.

६. सन २०१२ वर्षी या वर्षी “बायोअॅग्रीसर्ट युरोपियन प्रमाणिकरण संस्था, इटली यांनी जापनीज अॅग्रीकल्चर स्टँन्डर्ड (Japanees Agriculture Standard) या मानकांच्या जागतिक निरीक्षकांची (Worldwide Organic Inspector for JAS Standard) यादी प्रसिद्ध केली त्यात भारतीय म्हणून फक्त दोन लोकांचा समावेश केलेला होता त्यामढील एक नाव हे प्रशांत नाईकवाडी यांचे होते.

७. आय.एस.ओ ९००१-२००८ (ISO 9001: 2008) हे अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor) प्रशिक्षण इंटरनॅश्नल सर्टीफिकेशन सर्विसेस प्रा.ली. मुंबई यांच्याकडून यशस्वीरीत्या पूर्ण केले.

८.अपिडा (APEDA: Agriculture and Process food Export Developement Authority, New Delhi) यांच्या वतीने पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील सर्व भारतीय प्रमाणिकरण संस्थासाठी जयपूर, राजस्थान येथे आयोजित केलेल्या “पाळीव व दुग्धजन्य प्राणी सेंद्रिय मानके’(Animal Husbandry Organic Regulation for NPOP) याबाबतचे प्रशिक्षणात “नोका, प्रमाणिकरण संस्थेच्या वतीने सहभाग.

९. “बायोअॅग्रीसर्ट’ युरोपियन प्रमाणिकरण संस्था व “नोका’ यांच्या वतीने नेपाळ, भूतान, बांगलादेश व इटली इत्यादी देशात आंतराष्ट्रीय प्रमाणिकरण अधिकारी म्हणून बहुतांश प्रोजेक्ट चे प्रमाणिकरण केलेले आहे.

१०. थायलंड देशातील, बँकॉक येथील “कॅसरसर्ट’ या आंतराष्ट्रीय विद्यापीठात कृषी विभागातील पद्युत्तर विध्यार्थ्यांसाठी “ सेंद्रिय शेती व जागतिक बाजारपेठ “ (Organic Farming & International Trend) या विषयावर व्याख्यान.

११. रामेति (प्रादेशिक कृषी व्यवस्थापन व विस्तार प्रशिक्षण संस्था ) कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या खोपोली, कोल्हापूर, सातारा, पुणे, औरंगाबाद विभागाचा “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण’ या विषायासाठीचे व्याख्याते. जिल्हा कृषी अधिकारी ते कृषी सहाय्यक आदीं सर्व कृषी अधिकारी वर्गासाठी व महाराष्ट्रातील यांच्या अधीन कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी २००९ ते आजगायात या संस्थेच्या माध्यमातून अनेक वाख्याने.

१२. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर, पुणे (SILC) यांचे “सेंद्रिय शेती व आंतराष्ट्रीय सेंद्रिय शेतीचे मानके’ या विषयीचे अधिकृत व्याख्याते.

१३. २० फेब्रुवारी २०१३ रोजी “सेंद्रिय शेती, शाश्वत शेतीची दिशा’ या विषयावर “अॅग्रोवन’ दैनिकाने राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात प्रमाणित सेंद्रिय शेती या विषयावर अत्यंत प्रभावी व्याख्यान. सदर कार्यक्रमाचे “साम’ टेलिव्हिजन वाहिनीवर २१ फेब्रुवारी २०१३ रोजी “अग्रोवन’ या सदरात प्रेक्षपण.

१४. महाराष्ट्र सेंद्रिय शेती परिषद, (मॉफ), पुणे अफार्म,पुणे, मानस रुरल डेव्हलपमेंट,ठाणे, सुयश चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे, नवनिर्माण न्यास,दौंड आदी सामाजिक संस्थांच्या वतीने “सेंद्रिय शेती’ संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेत शेतकऱ्यांसाठी “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण’ या विषयी अनेक व्याख्याने.

१५. आजगायात महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये १००० हून अधिक “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण’ याविषयी शेतकरी, कृषी अधिकारी, विध्यार्थी, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठीचे व्याख्याने.

१६. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय गटपद्धतीद्वारे सेंद्रिय प्रमाणिकरण प्रक्रियेत अनेक शेतकरी गटांना प्रमाणिकरण प्रक्रियेत विनाशुल्क सहाय्यता व मार्गदर्शन. आदिवाशी शेतकऱ्यांच्या माध्यामातू गटाचे सेंद्रिय शेती करण्यासाठी कार्यरत व निर्यातदार व अडतदार यांच्या मदतीने विपणन करण्यासाठी प्रयत्नशील.

१७.“अॅग्रोवन, या सकाळ समूहाच्या कृषी दैनिकाचे “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण ’ विषयाचे स्तंभलेखक

१८. सकाळ “अॅग्रोवन गाईड, मधील सेंद्रिय शेती विषयाचे संपूर्ण लेखन केलेले आहे.

१९. “पूर्वा कृषीदुत, मेघदुत, बळीराजा, वनराई, अॅग्रोटेक, वनराई, संगमसंस्कृती, गोडवा, कृषी साधना’ इत्यादी नामांकित कृषी मासिकांमधून सेंद्रिय शेती विषयक अनेक बाबींसंधर्भात लेखन.

२०. महाराष्ट्र सेंद्रिय शेती परिषद (मॉफ), पुणे यांच्या वतीने अनेक अल्पभूधारक व अधिवाशी शेतकऱ्यांचे पी.जि.एस प्रमाणिकरण पद्धतीद्वारे प्रमाणिकरण, मार्गदर्शन तसेच मुंबई , पुणे व नाशिक येथील निर्यातदार व व्यापारी मंडळींच्या मदतीने सेंद्रिय शेतकऱ्यांच्या मालाला मार्केट लिंकेज द्वारे विपणन करण्याकरिता विनाशुल्क मदत.

२१. “अॅग्रोवन, या सकाळ समूहाच्या कृषी दैनिकाने नोव्हेंबर २०१५ महिन्यात “बोगस जैविक कीटकनाशकांचे जीवघेणे जग’ या सदराखाली श्री. मंदार मुंडले (उपसंपादक) याच्या मार्गदर्शनाखाली एक मालिका चालविली होती त्यात “संजीवकांच्या गुणवत्तेचे निकष काय ?’ या सदराखाली प्रशांत नाईकवाडी यांनी जैविक संजीवाकांमधील भेसळ कशी केली जाते यावर मते मांडली होती त्याचा फार मोठा परिणामकारक उहापोह जैविक निविष्ठा उत्पादक व शेतकरी वर्तुळात झाला होता.

२२. मोबाईल च्या “व्हॅाट्स उप’ ह्या सामाजिक माध्यमाद्वारे देशातील तसेच राज्यातील सेंद्रिय शेतकरी, शासकीय कृषी अधिकारी, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक, सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या सामाजिक संस्था त्यांचे प्रतिनिधी, कृषी विध्यापिठातील तज्ञ व शाश्रज्ञ आणि सेंद्रिय प्रमाणिकरण अधिकारी यांच्या माध्यमातून “ग्लोबल ऑर्गनिक मुव्हमेंट’ हा ग्रुप बनविला आहे याद्वारे सेंद्रिय चळवळीतील चालू घडामोडी व तांत्रिक माहिती सर्वांपर्यत पोहोचावी म्हणून प्रयत्नशील !

२३. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानांतर्गत परंपरा कृषि विकास योजना – सेंद्रिय शेती अंतर्गत “सहभाग हमी प्रमाणिकरण पद्धती’ (पी.जी.एस) पुस्तिका निर्मिती साठी आत्मा, कृषी विभाग ,महाराष्ट्र शासन यांच्याकरिता संपूर्ण पुस्तिकेचे लिखाण.

२४. सकाळ प्रकाशनाच्या माध्यमातून १. तांत्रिकदृष्टीकोनातून सेंद्रिय शेती व २. सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय मानके हे दोन पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यातील “तांत्रिक दृष्टीकोनातून सेंद्रिय शेती” पुस्तकास २०१६ चा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या कृषिविषयक साहित्यासाठीचा ज.रा.कदम हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२५. सुयश चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे यांनी डॉ.हेडगेवार स्मृती सभागृह, नागपूर येथे राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा, छत्तीसगड येथील आदिवाशी शेतकऱ्यांसाठी त्रैवार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता जवळ पास १२०० आदिवाशी शेतकऱ्यांना “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण’ या विषयासाठीचे ६ व्याख्याने यावेळी दिले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन झी मेडीयाचे चेरमन डॉ.सुभाष चंद्रा व आदरणीय सरसंघ चालक श्री. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले होते.

२६. दिनांक १९/०५/२०१६ रोजी कृषि भवन, पुणे येथे “शाश्वत शेती अभियानांतर्गत राष्ट्रीय परंपरागत कृषि विकास योजनेच्या’ माध्यमातुन सेंद्रीय शेतीचे राज्यस्तरीय कार्यशाळा राज्यातील आत्मा विभागाच्या प्रकल्प संचालकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासाठी “पी.जी.एस इंडिया कार्यक्रमाची सेंद्रीय शेतीचे मानके’ याबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

२७. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास सेंद्रिय शेती योजनेची भारताची सह्भागीता हमी प्रमाणिकरण (PGS INDIA) ह्या योजनेच्या माहितीपर ३ ऑगस्ट २०१६ पासून दर बुधवार व दर शनिवारी कृषी दैनिक अॅग्रोवोन मधून १६ अंकांची लेख मालिका प्रकाशित करण्यात आली. हि योजना शेतकरी व अधिकारी यांच्या पर्यत पोहोचण्यासाठी या मालिकेला विशेष महत्व प्राप्त झाले व संपूर्ण महाराष्ट्रात या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

28.“भारताची सह्भागीता हमी प्रमाणिकरण’ राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास सेंद्रिय शेती योजनेची “भारताची सह्भागीता हमी प्रमाणिकरण’ (PGS INDIA) योजनेच्या अनुषंगाने राज्यात आजपर्यत गडचिरोली, पुणे, जालना, कोल्हापूर, सिंदुदुर्ग, अहमदनगर जिल्ह्यात सदर योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर योजनेचे शेतकरी गट, आत्मा विभागातील अधिकारी तसेच शेतकरी यांच्यासाठी आत्मा, प्रकल्प संचालक यांच्यावतीने जिल्हानिहाय मार्गदर्शन पर वाख्याने.

२९. “ग्लोबल ऑर्गनिक मुव्हमेंट’ या सामाजिक माध्यम “व्हॅाट्स उप’ द्वारे सुरु केलेल्या ग्रुपचे परिषदेत रुपांतर करून अकोले तालुक्यातील आदिवाशी शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै २०१६ ला राज्यस्तरीय सेंद्रिय शेती परिषदेचे आयोजन.

३०. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाती ल नाशिक, नगर व पुणे विभागातील महाविद्यालांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय संगमनेर येथे दि. १३ ते १८ डिसेंबर २०१६ रोजी “स्वच्छ भारत आरोग्य संपंन्न भारत’ मोहिमे अंतर्गत “राष्ट्रीय योजना शिबीरात. “सेंद्रिय शेती व सुरक्षित अन्न’ याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

३१. पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (C.R.P.F) यांच्या देशभरातील विविध बटालियन (हायद्राबाद, जयपूर, जोहराट, जम्मू, बिहार, मणिपूर,झारखंड) मधील जवानांना राष्ट्रीय काढणी पश्यात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे (NIPHT: National Institute for Post Harvest Technology, Pune) येथे “सेंद्रिय शेती व तत्सम विषयी’ प्रशिक्षक म्हणून कार्यरत.

३२. नेपाळ देशात काठमांडू शहरात नेपाल संसदेने (House of Rajkarnikaran) तेथील कृषी मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "International Agrotrade and Investment Exhibition & Conference' 2017 ह्या कार्यक्रमात तेथील हाउस ऑफ राजकारणीकर यांच्या आमंत्रण स्वीकारून भारत देशाचे प्रतिनिधि म्हणून "Organic certification & International Regulation' ह्या विषयावर सुमारे ९० मिनिटे व्याख्यान दिले व त्यानंतर नेपाळ राष्ट्रीय टेलिव्हिजन (NTV) वाहिनीने "What should be Organic policy of Nepal country & current scenario' या विषयावर मुलाखात घेतली सदर मुलाखात १४ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री संपूर्ण नेपाळ देशात प्रसारित करण्यात आली.

३३. "ॲग्रोव्हीजन ' या मध्य भारतातील सर्वात मोठे क्रुषी प्रदर्शनाचे आयोजन नागपुर येथे केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. दिनांक 11 नोव्हेंबर 2017 होणाऱ्या " सेंद्रीय शेती व प्रमानिकरण' या चर्चासत्रासाठी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांना व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित शेतकरी, तज्ञ व विद्यार्थी वर्गांने ऊस्पुर्त प्रतिसाद दिला.

३४. दिनांक ०९/१२/२०१७ रोजी नाशिक येथे "यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक संचलीत क्रुषी विज्ञान केंद्र येथे क्रुषी तंत्रज्ञान सप्ताह निम्मित विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे "सेंद्रीय शेती व प्रामाणिकरण' ह्या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

३५. दि.6/01/2018 रोजी औरंगाबाद येथे "महाॲग्रो' या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या क्रुषी प्रदर्शन व चर्चासत्रात "सेंद्रीय शेती तंत्रज्ञान, प्रमाणिकरण आणि मार्केटींग' या विषयी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी क्रुषी आयुक्त श्री.उमाकांत दांगट होते या वेळी विधानसभेचे अध्यक्ष मा.ना हरीभाऊ बागडे तसेच जेष्ठ क्रुषीतज्ञ श्री. विजय अण्णा बोऱ्हाडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

३६.दिनांक 8/02/2018 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत व प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरानगर , लोणी आयोजीय “New Perspectives in Nano Herbal Medicine” विषयी एकदिवसीय राज्यस्तरिय परिषद पार पडली. यांप्रसंगी उद्घाटक प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणुन डॉ. प्रशांत नाईकवाडी यांची उपस्थिती.

३७. दिनांक 02/02/2018 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत व संगमनेर महाविद्यालय संगमनेर आयोजित “माती , पाणी परीक्षण व खतांचे व्यवस्थापन’ विषयावर आज कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणुन डॉ.प्रशांत नाईकवाडी सर यांना निमंत्रित केले होते. या वेळी “सेंद्रिय शेती हि काळाची गरज का आहे ? यावर सरांचे व्याख्यान झाले या वेळी प्राचार्य डॉ.के.के देशमुख सर, प्रा.डॉ.साबळे , आत्मा क्रुषि विभाग श्री.वैभव कानवडे , क्रुषि विभागातील सौ.अर्चना आंबरे -खताळ मँडम, श्री.भोर साहेब तसेच कोकणगावचे सरपंच श्री. थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास रसायनशाश्र शाखेचे पदवूत्तर महाविद्यालयातील विद्यार्थी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

३८. " Residue Free Organic Mission India Federation' (ROMIF) या संस्थेची राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. फेडरेशनची पहिली बैठक दिनांक २३/०१/२०१८ मंगळवार रोजी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर, बाणेर, पुणे (SICL) येथे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळपास १०० निमंत्रित सदस्य सेंद्रिय शेतीला अनुसरून विविध क्षेत्रात काम करणारे (सामाजिक संस्था, प्राध्यापक, प्रमाणीकरण अधिकारी, शेतकरी, प्रक्रीयाकार, ट्रेडर्स , शाश्रज्ञ ,शासकीय अधिकारी इत्यादी) या बैठक वजा कार्यशाळेस हजर होते. फेडेरेशन चे चेअरमन व सेंद्रिय शेती अभ्यासक डॉ.प्रशांत नाईकवाडी यांनी फेडरेशनचे ध्येय धोरणे काय आहेत याचे प्रेसेंटेशनसहित माहिती दिली.








My Work



“नोका’ या प्रमाणिकरण संस्थेअंतर्गत २००८ ते आजगायत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम, नागलँड, ओरिसा, अरुणाचलप्रदेश कर्नाटक, केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्यात जवळपास ५०,००० हेक्टर क्षेत्राचे व २५००० हून जास्त शेतकर्यांचे गट सेंद्रिय शेती प्रमाणिकरण पद्धती व वैयक्तिक सेंद्रिय शेती प्रमाणिकरण पद्धतीद्वारे प्रमाणिकरण निरीक्षण अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.

देशभरातील नामांकीत जैविक निविष्ठा (जैविक बियाणे, खते व जैविक कीटकनाशके) व कृषीमालावर प्रक्रिया करणाऱ्या जवळपास २५० हून अधिक कंपन्यांचे प्रमाणिकरण निरीक्षण अधिकारी म्हणून काम पहिले आहे.

स.न २०११ मध्ये जर्मनी देशातील न्युरेंबर्ग शहरात जर्मन कॉंग्रेस व आयफॉम आयोजित बयोफॅच विव्हानेस १४-१९ फेब्रुवारी २०११ आयोजित या जागतिक “सेंद्रिय शेती परिषदेला’ “नोका’ या प्रमाणिकरण संस्थेकडून भारत देशाचे प्रतिनिधित्व. या परिषदेत १२८ देशातील कृषी विभागातील शासकीय अधिकारी, शाश्रज्ञ, सेंद्रिय पदार्थांचे व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक, सेंद्रिय प्रमाणिकरण संस्थेचे अधिकारी यांचा समावेश होता

बायोअॅग्रीसर्ट युरोपियन प्रमाणिकरण संस्था, बोलोग्ना, इटली येथे आंतराष्ट्रीय प्रमाणिकरण (निरीक्षक) अधिकारी हे विविध देशातील “आंतराष्ट्रीय सेंद्रिय मानके व प्रमाणिकरण पद्धती या विषयाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

विषमुक्त शेती उत्पादने

माजी केंद्रीय कृषीमंत्री मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गट यांची पुणे शहरात विषमुक्त शेती उत्पादने मार्केटिंग करण्याबाबतची वसंतदादा शुगर ईस्ट्युयुट, मांजरी, पुणे दि.24/10/17 सकाळी 11.00 वा. पार पडली.सेंद्रीय उत्पादने विक्रीसाठी साहेबांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी सम्पर्क साधून आदेश दिले सदर बैठक अंकुश पड़वळे (क्रुशि क्रांती क्लब, मंगळवेढा, सोलापूर) यांनी निमंत्रित केली होती तसेच पुणे जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक सुनील बोरकर साहेब यांनी सेंद्रीय शेतकऱ्यांची मार्केटिंग बाबत अतिशय चांगली बाजू साहेबांसमोर मांडली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन

महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन व अनुसंधान परिषदेचे राज्यमंत्री माननीय डॉ राम खर्चे साहेब यांचा सत्कार करताना कृषी पदवीधर संघटनेचे कार्यकारी मंडळाचे संचालक व सेंद्रिय शेती तज्ञ् डॉ प्रशांत नाईकवाडी. समवेत माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर सो व प्रवीणदादा गायकवाड इत्यादी.


ॲग्रोवन क्रुषी दैनिक

ॲग्रोवन क्रुषी दैनिक व व्येंकटेश ॲग्रोट्रेड प्रा.ली यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील “दाभोड ‘ येथे शेतक-यांसाठी आज रविवार दि.२८जानेवारी २०१८रोजी “ऊस शेती व सेंद्रिय व्यवस्थापन' या विषयी चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना. .


एकदिवसीय राज्यस्तरिय परिषदरु

दिनांक 8/02/2018 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत व प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, प्रवरानगर , लोणी आयोजीय “New Perspectives in Nano Herbal Medicine” विषयी एकदिवसीय राज्यस्तरिय परिषद पार पडली. यांप्रसंगी उद्घाटक प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणुन डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित .


सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण

पूर्वा केमटेक प्रा.ली कंपनीच्या मार्केटिंग स्टाफसाठी "सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण' या विषयी मार्गदर्शन करतांना व सत्कार करतांना डॉ.बी.बी.पवार सर


“माती , पाणी परीक्षण व खतांचे व्यवस्थापन’

दिनांक 02/02/2018 रोजी संगमनेर महाविद्यालय संगमनेर येथे “माती , पाणी परीक्षण व खतांचे व्यवस्थापन’ विषयावर आज कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.प्रशांत नाईकवाडी सर यांना निमंत्रित केले होते. या वेळी “सेंद्रिय शेती हि काळाची गरज का आहे ? यावर सरांचे व्याख्यान झाले


रेसिड्यू फ्री ऑर्गणीक मिशन इंडिया फेडरेशन

" Residue Free Organic Mission India Federation' (ROMIF) या संस्थेची राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. फेडरेशनची पहिली बैठक दिनांक २३/०१/२०१८ मंगळवार रोजी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर, बाणेर, पुणे (SICL) येथे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून (पुणे, मुंबई, ठाणे, लातूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर , सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, रायगड, सिंदुदुर्ग, कोलाहापूर, सातारा , सांगली ) जवळपास १०० निमंत्रित सदस्य सेंद्रिय शेतीला अनुसरून विविध क्षेत्रात काम करणारे (सामाजिक संस्था, प्राध्यापक, प्रमाणीकरण अधिकारी, शेतकरी, प्रक्रीयाकार, ट्रेडर्स , शाश्रज्ञ ,शासकीय अधिकारी इत्यादी) कार्यक्रमाच्या सुरवातीला अमोल बिरारी सरांनी "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर' बाबत माहिती दिली नंतर सेंद्रिय शेती अभ्यासक डॉ.प्रशांत नाईकवाडी यांनी फेडरेशनचे ध्येय धोरणे काय आहेत याचे प्रेसेंटेशनसहित माहिती दिली.

“सेंद्रिय शेती व फुड सेफ्टी'

आज विद्याप्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी , बारामती येथे माझे NSS कँपमधील विद्यार्थी यांना पींपळी येथे तसेच इतर विद्यार्थांना कॉलेज मधील ऑडिटोरियम येथे “सेंद्रिय शेती व फुड सेफ्टी' या विषयावर दोन लेक्चर आमचे गुरुवर्य प्रा.ताबे यांनी आयोजीत केले होते.


सेंद्रीय शेती तंत्रज्ञान, प्रमाणिकरण आणि मार्केटींग

दि.6/01/2018 रोजी औरंगाबाद येथे "महाॲग्रो' या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या क्रुषी प्रदर्शन व चर्चासत्रात "सेंद्रीय शेती तंत्रज्ञान, प्रमाणिकरण आणि मार्केटींग' या विषयी माझे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी क्रुषी आयुक्त श्री.उमाकांत दांगट होते या वेळी विधानसभेचे अध्यक्ष मा.ना हरीभाऊ बागडे तसेच जेष्ठ क्रुषीतज्ञ श्री. विजय अण्णा बोऱ्हाडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.


अॅग्रोवन कृषी सवांद'

अॅग्रोवन या सकाळ समूहाच्या कृषी दैनिका मार्फत "अॅग्रोवन कृषी सवांद' कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागात "पीकनिहाय तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती' या विषयी मार्गदर्शन करतांना


“सकाळ इंटरनेशनल लर्निँग सेंटर’

1 दिसेंबर 2017 “सकाळ इंटरनेशनल लर्निँग सेंटर’ पुणे यांनी मल्टिलाईन ॲग्रोटेक प्रायोजित “सेंद्रीय शेतीत करा उत्पन्न दुप्पट’ या विषया संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यात डॉ. हरिहर कौसडिकर सर व डॉ.प्रशांत नाईकवाडी यांचे लेक्चर ठेवण्यात आले होते. या कार्यशाळेस प्रचंड प्रतिसाद मिळाला.


"सेंद्रीय शेती व प्रामाणिकरण'

नाशिक येथे "यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक संचलीत क्रुषी विज्ञान केंद्र येथे क्रुषी तंत्रज्ञान सप्ताह निम्मित विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी डॉ.प्रशांत नाईकवाडी यांचे "सेंद्रीय शेती व प्रामाणिकरण' ह्या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी कुलगुरू ई .वायुनंदन सरांनी शॉल व केशर आंब्याचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला.


सेंद्रिय शेती काळाची गरज

आर.के फौंडेशन यांच्या कृषिक्रांती पुरस्कार सोहळ्यात "सेंद्रिय शेती काळाची गरज' या विषयी मार्गदर्शन करतांना


सहभागीता हमी प्रमाणीकरण

आत्मा कृषी विभाग पुणे जिल्हा परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत पी.जी.एस (सहभागीता हमी प्रमाणीकरण ) विषय संदर्भात मार्गदर्शन करतांना



ॲग्रोव्हीजन

"ॲग्रोव्हीजन ' या मध्य भारतातील सर्वात मोठे क्रुषी प्रदर्शनाचे आयोजन नागपुर येथे केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. दिनांक 11 नोव्हेंबर 2017 होणाऱ्या " सेंद्रीय शेती व प्रमानिकरण' या चर्चासत्रात डॉ.प्रशांत नाईकवाडी यांना व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते . माझ्या व्याख्यानाला उपस्थित शेतकरी, तज्ञ व विद्यार्थी वर्गांने ऊस्पुर्त प्रतिसाद दिला.


सेंद्रिय निविष्ठा व अत्याधुनिक तंत्रज्ञान

व्येन्कटेश अॅग्रोट्रेड प्रा.ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीलर मिटिंग मध्ये "सेंद्रिय निविष्ठा व अत्याधुनिक तंत्रज्ञान' यावर मार्गदर्शन करतांना.



ॲग्रोट्रेड & इनवेस्टमेंट

नेपाळ देशात काठमांडू शहरात पार पडलेल्या ॲग्रोट्रेड & इनवेस्टमेंट ह्या 22 देशांच्या सहभाग असलेल्या आंतराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सेंद्रीय शेती आंतराष्ट्रीय प्रामाणिकरण तज्ञ व सेंद्रीय शेतीचे आभ्यासक डॉ.प्रशांत नाईकवाडी यांचे व्याख्यान आयोजित केले होते तसेच नेपाळ देशातील तेथील राष्ट्रीय टेलिव्हिजन चॅनेल ने घेतलेली मुलाखत सर्व नेपाळ देशात "कृषीसबंध' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.


अॅग्रोकेअर कृषी प्रेरणा पुरस्कार

१ जुलै कृषी दिन व अॅग्रोकेअर कृषीमंच, नाशिक यांच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन "अॅग्रोकेअर कृषी प्रेरणा पुरस्कार' वितरण समारंभ हॉटेल "सूर्या' नाशिक येथे उत्साहात पार पडला. विविध कृषी क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशांत नाईकवाडी सरांना सेंद्रिय शेतीतील साहित्य, संशोधन व प्रशिक्षण या एकंदरीत कामगिरीसाठी "अॅग्रोकेअर कृषी प्रेरणा पुरस्कार' २०१७ देऊन गौरविण्यात आले.


"कृषिभूषण'

दिनांक २१ मे रोजी गोवा, पणजी येथे कला आणि संस्कृती भवन, संस्कृती संचालानय येथे महाराष्ट्र फौंडेशन, सोलापुर यांचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण राज्यातील विविध क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ३० मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रशांत नाईकवाडी सरांना यावेळी राज्यस्तरीय "कृषिभूषण' हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार गोवा राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.ना गोविंद गावडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला


"तांत्रिकदृष्टीकोनातून सेंद्रिय शेत"

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा १११ वा वर्धापन दिन समारंभ व पुरस्कार प्रदान सोहळा २६ मे २०१७ रोजी महात्मा फुले सभागृह, शिक्षणशाश्र संस्था, कुमठेकर मार्ग, पुणे ३० येथे उत्साहात पार पडला. प्रशांत नाईकवाडी सरांना त्यांच्या लिखित व सकाळ प्रकाशन प्रकाशित “तांत्रिकदृष्टीकोनातून सेंद्रिय शेती’ या ग्रंथाला कृषिविषयक साहित्याचा मानाचा ज.रा.कदम हा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रमुख पाहुण्या मा.वैदेही ( साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त , प्रसिध्द कन्नड लेखिका) तसेच डॉ.रावसाहेब कसबे (अध्यक्ष, म.सा.प, जेष्ठ विचारवंत व साहित्यिक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

"डॉ.डेव्हिड मिझ्हार्ची यांनी भेट दिली"

फूड अँड ईन प्रा.ली , सिन्नर फ्रुट पल्प व ज्यूस निर्यात करणाऱ्या कंपनीला इस्राईल देशातील कृषी शाश्रज्ञ डॉ.डेव्हिड मिझ्हार्ची यांनी भेट दिली त्यावेळी "सेंद्रिय पद्धतीने डाळिंब उत्पादन घेणे शक्य आहे का ? "तसेच सेंद्रिय डाळिंब उत्पादन पद्धती' यासाठी सेंद्रिय शेती तज्ञ डॉ.प्रशांत नाईकवाडी यांना मार्गदर्शक म्हणून बोलाविले होते. .


"सेंद्रिय शेती व निर्याती"

बारामती ६ मे २०१७ रोजी कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी दरवर्षी प्रमाणे चैत्र पालवी ह्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन आप्पासाहेब पवार सभागृह, शारदानगर येथे केले होते. त्यानिम्मित सदर संस्थेने डॉ.प्रशांत नाईकवाडी यांना "सेंद्रिय शेती व निर्यात' या विषयावर मार्गदर्शन करण्यास निमंत्रित केले होते. जेष्ठ जलतज्ञ विजय अण्णा बोऱ्हाडे यांनी यावेळी आंब्याचे झाड भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमा दरम्यान राजेंद्र दादा पवार साहेबांची भेट झाली


"सातबाराच्या बातम्या"

कोल्हापूर येथे "एबीपी माझा' ह्या वृत्त वाहिनीचे पत्रकार खोले साहेबांनी परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती ह्या योजने अंतर्गत पीजीएस- प्रमाणिकरण योजनेबद्दल मी दिलेली माहिती प्रेक्षपणा साठी शूट केली लवकरच हि माहिती"एबीपी माझा' ह्या वृत्त वाहिनीच्या "सातबाराच्या बातम्या' ह्या सदरात प्रसारित केली जाणार आहे


"सहभागीता हमी प्रमाणीकरणा"

कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग ,पनवेल येथील सर्व आत्मा विभागातील कृषी अधिकाऱ्यांना प्रंतप्रधान परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत पी.जी.एस-इंडिया (सहभागीता हमी प्रमाणीकरण ) विषय संदर्भात मार्गदर्शन करतांना डॉ.प्रशांत नाईकवाडी समवेत श्री.अशोक लोखंडे साहेब व सुनील बोरकर साहेब


" सेंद्रिय शेती योजना "

दिनांक: ५ मार्च २०१७ रोजी राधानगरी जि. कोल्हापूर येथे परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत सेंद्रिय शेती योजना व सहभाग हमी प्रमाणिकरण या विषयावर डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे व्याख्यान श्री. विजय जाधव यांच्या शेतावर भव्य कार्यक्रम आयोजित केला होता प्रतक्ष प्रात्यक्षिक व माहिती या धर्तीवर हा कार्यक्रम होता यावेळी ABP माझा चे खोले साहेब हेही उपस्थित होते समवेत आत्मा प्रकल्प उपसंचालक श्री.गळीतकर साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.रवींद्र पथक साहेब व इतर अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


" उत्कृष्ट लिखाण श्रेणी "

दिनांक १७ मार्च २०१७ रोजी कालिदास नाट्यसभागृहात पूर्वा कृषिदुत शेतकरी गौरव समारंभात उत्कृष्ट लिखाण श्रेणी मध्ये सेंद्रिय साहित्यासाठी उत्कृष्ट लेखक म्हणून डॉ.प्रशांत नाईकवाडी यांना पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माझे गुरुवर्य डॉ.अरुण अडसूळ , महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी माजी कुलगुरू डॉ.राजाराम देशमुख, कृषी सहसंचालक डॉ.कैलास मोते तसेच पूर्वा कृषिदुत चे संपादक योगेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला


" वसंतराव नाईक पुरस्कारी "

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या स्व. यशवंतराव चव्हाण पुरस्कार योजने अंतर्गत कृषी वाग्मयासाठीचा दिला जाणारा "वसंतराव नाईक पुरस्कार' उत्तर प्रदेशचे राज्यपाल "राम नाईक' यांच्या हस्ते स्वीकारताना




" जनरल मिल पुरस्कृत व बायफ संस्था "

जनरल मिल पुरस्कृत व बायफ संस्था संचालित अदिवशी शेतकरी विकास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हुअनुन प्रशांत नाईकवाडी यांची उपस्थिती तसेच प्रमुख मार्गदर्शक गट शेतीचे प्रवर्तक नाथराव कराड यांचा सन्मान करतांना.



" उत्कृष्ट सेंद्रिय संशोधक "

अविष्कार फौंडेशन , कोल्हापूर यांचा राज्यस्तरीय 'उत्कृष्ट सेंद्रिय संशोधक' पुरस्कार डॉ.प्रशांत नाईकवाडी यांना प्रदान करतांना सोलापूर गुप्तहेर विभागाचे पोलीस अधीक्षक दीपक आर्वे साहेब, संस्थापक अविष्कार फौंडेशन श्री.संजय पवार इति.



"प्रंतप्रधान परंपरागत कृषी विकास योजना "

सिंदुदुर्ग जिल्ह्यातील आत्मा विभागातील कृषी अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना "प्रंतप्रधान परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत पी.जी.एस-इंडिया (सहभागीता हमी प्रमाणीकरण )' विषय संदर्भात मार्गदर्शन करतांना डॉ.प्रशांत नाईकवाडी


"सेंद्रिय शेती व आरोग्य "

दिनांक ६ जानेवारी National Institute for Post Harvest technology (NIPHT) तळेगाव दाभाडे येथे CRPF (Central Reserved police force) यांचे देशातील त्यांच्या विविध प्रशिक्षण ठिकाणाहून (केरळ, आंध्रप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तमिलनाडु, गुजरात )काही जवानांचे पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते शेवटच्या दिवशी प्रशांत नाईकवाडी साहेबांचे "सेंद्रिय शेती व आरोग्य' या विषयावर लेक्चर आयोजित केले होते या वेळी CRPF चे दक्षिण भारताचे DIG श्री. सुरेंद्र कुमार हे पाहणी करण्यासाठी आले होते त्यांना ही सरांचे लेक्चर ऐकण्याचा मोह आवरला नाही जवळ पास शेवटच्या अर्ध्या तासाचे सम्पूर्ण लेक्चर ऐकून काही प्रश्नांचे शंका निरिसन करुन प्रशांत सरांचे आभार मानले.

"जनरल मिल पुरस्कृत बायफ "

जनरल मिल पुरस्कृत बायफ संस्था आयोजित आदिवशी महिला मेळाव्यात महिलांचा पुरस्कार देऊन गौरविताना










Gallery






Videos






Awards

महाराष्ट्र शासन यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुति मंडळाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार योजने अंतर्गत २०१६ चा क्रुषी विषयक वाड्मयासाठी “वसंतराव नाईक वाड्मय पुरस्कार’ डॉ.प्रशांत नाईकवाडी लिहिलेल्या व सकाळ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या “तांत्रिकदृष्टीकोनातून सेंद्रीय शेती’ या पुस्तकासाठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी उत्तर प्रदेशाचे राज्यपाल आदरणीय राम नाईक साहेब व मराठी भाषामंत्री ना.विनोद तावडे यांच्या हस्ते भाषा दिनाच्या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

क्रूषीभूषण रावसाहेब कड्लग यांच्या नावे असलेल्या आर.के फाउंडेशनचा 2017 चा “क्रुषीक्रांती युवा संशोधक’ पुरस्कार सेंद्रिय शेती अभ्यासक डॉ.प्रशांत नाईकवाडी यांना माजी महसुल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

सन २०१६ चा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा “तांत्रिकदृष्टिकोनातुन सेंद्रिय शेती’ ह्या पुस्तकास राज्यस्तरीय ज.रा. कदम हा कृषिविषयक साहित्य साठीचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका मा.वैदही व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. .

अॅग्रोकेअर कृषीमंच, नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा "अॅग्रोकेअर कृषी प्रेरणा पुरस्कार' सन २०१६ – २०१७ सेंद्रिय शेतीतील साहित्य, संशोधन व प्रशिक्षण या एकंदरीत कामगिरीसाठी नाशिक जिल्हा कृषी अधीक्षक श्री. तुकाराम जगताप साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.

सन २०१७ चा महाराष्ट्र फौंडेशन, सोलापूर यांचा “सेंद्रिय शेतीतील साहित्य व संशोधन’ विषयीचा “राज्यस्तरीय कृषिभूषण” पुरस्कार "गोवा' राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.ना.गोविंदजी गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सन २०१५-१६ प्रहार दैनिकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रहार भूषण पुरस्कार समारंभात एकंदरीत कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरी साठी नाम फौंडेशन चे संस्थापक मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सन २०१६ चा अविष्कार फाउंडेशन, कोल्हापुर यांचा सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण या विषयी साहित्य, प्रशिक्षण व संशोधन यासाठीचा ‘उत्कृष्ट सेंद्रियरत्न संशोधन’ हा राज्य स्तरीय पुरस्कार सोलापूर गुन्हे अन्वेषण .

सन २०१६ चा ‘अॅग्री ऑर्गनिक रिसर्च फौंडेशन, (और्स) नाशिक यांचा आंतराष्ट्रीय कृषि शाश्रज्ञ "जॉर्ज वाशिंग्टन कार्वर पुरस्कार' यांच्या नावाचा सेंद्रीय शेतीतील साहित्य, प्रशिक्षण, प्रचार व प्रसार इत्यादी भरीव कामगिरी बद्दल राज्यस्तरीय पुरस्कार जेष्ठ शेतकरी नेते श्री. विजय जावांदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

देशमुख मराठा समाज नाशिक जिल्हा सन २०१६ – २०१७ गुणगौरव समारंभात मराठी कृषी साहित्यासाठी शांताबाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कार देऊन विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

सन २०१६-१७ चा “पूर्वा कृषिदुत’ ह्या मासिका मधून “सेंद्रिय शेतीतील तांत्रिक बाबी व प्रमाणिकरण’ याविषयी लिखाणाबद्दलचा “उत्कृष्ट लिखाण पुरस्कार’ डॉ.अरुण अडसूळ (माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

सन २०१५ चा “कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र यांचा सेंद्रिय क्षेत्रातील साहित्य यासाठीचा “राज्यस्तरीय युवा प्रताप’ पुरस्कार मा.ना. राम खर्चे साहेब (उपाध्यक्ष , महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन अनुसंसाधन परिषद, पुणे ) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

सन २०१५ चा “पूर्वा कृषिदुत’ ह्या मासिका मधून सेंद्रिय शेती विषयी तांत्रिक साहित्य विषयी लिखाणाबद्दलचा “उत्कृष्ट लिखाण पुरस्कार’ डॉ.वाय.एस. नेरकर (माजी कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला..

सन २०१६ चा “कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र यांचा “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण या विषयातील “साहित्य, संशोधन व प्रशिक्षण’ या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दलचा “राज्यस्तरीय युवा प्रताप’ पुरस्कार नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सन २०१३ चा “पूर्वा कृषिदुत’ ह्या मासिका मधून “सेंद्रिय शेती व प्रमाणिकरण’ विषयी लिखाणाबद्दलचा “उत्कृष्ट लिखाण पुरस्कार, आदरणीय भीष्मराज बाम साहेब (सेवानिवृत्त, भारतीय प्रशासन अधिकारी) यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.








Connect

I would love to hear from you. Your feedback, suggestions and work invitations are always welcome!
Please get in touch with me via the form below.